Nov 8, 2020

                 *संवाद*

“दादा, येते हं. नील, आजोबांना टाटा कर पाहू.” असं म्हणून रेणू एका हातात नील आणि दुसऱ्या हातात पाळणाघरात द्यायची पिशवी, शिवाय स्वत:ची पर्स अशी कसरत करत निघाली. देवधरांनी नातवाला कौतुकाने अच्छा केला खरा पण दुसऱ्याच क्षणी ते त्यांच्या विचारांच्या कोशात गुरफटले. सकाळपासून रेणूने बोललेलं हे तिसरं वाक्य होतं. पहिलं वाक्य “चहा घेताय ना” दुसरं वाक्य तिच्या चहाबरोबर पुन्हा “चहा घेता का थोडासा?”ही केलेली विचारणा. आणि तिसरं हे ऑफिसला निघाल्यावरचं वाक्य. ती जायची आणि मग तो सहा खोल्यांचा मोठा ब्लॉक, रेणूने ओट्यावर आणि नीलने घरभर केलेला पसारा. रेणूने करून ठेवलेला मिळमिळीत स्वयंपाक आणि भिंतीवरचा सुधाताईंचा हसरा फोटो हे उरायचं देवधरांसाठी आणि दिवसभर ते त्यातच गुरफटायचे. स्वत:च्या एकटेपणाचा आलेला राग कधी स्वयंपाकघरातल्या अन्नावर, तर कधी घरातल्या पसाऱ्यावर काढत ते कुढत बसायचे."देवधर, येताय ना?” अशी कर्व्यांची खणखणीत हाक ऐकू आल्यावर देवधर दचकले. त्यांनी टेरेसमधून समोरच्या इमारतीतल्या बाल्कनीत उभे राहून हाक मारणाऱ्या कर्व्यांना निघायची खूण केली आणि ते घर बंद करून निघाले. औंकारेश्वराच्या त्या देवळात कर्वे गेली आठ ते दहा वर्ष नेमाने जात होते. बरोबर अकरा ते एक या वेळात त्यांच्यासारख्याच साठी उलटून गेलेल्या सिनियर सिटिझन्सचा ग्रुप तिथे जमायचा. प्रत्येकाच्या प्रकृतीच्या तक्रारी सारख्याच असायच्या. घरातला एकटेपणा, जनरेशन गॅप, इतकंच काय पण सरकारची बदललेली टॅक्स पॉलिसी हा सुद्धा सर्वांचा  जिव्हाळ्याचा विषय असायचा. प्रत्येकाचंच आपापल्या दु:खातून बाहेर यायचं हे एकमेव ठिकाण होतं, हक्काचं !!!!. सुधाताईंच्या निधनानंतर कोसळून गेलेल्या देवधरांनाही कर्व्यांनी इथे आणलं होतं. आज सर्वांच्याच गप्पा रंगल्या होत्या राजकारणावर. अडवानी आणि त्यांचे हिंदू राष्ट्राविषयीचे कथित वक्तव्य यावरून संघवाल्या परांजप्यांची सर्वजण फिरकी घेत होते. देवधर आणि कर्वेही त्यात सामील झाले. परांजपे सर्वांना गप्प करून बेजार झाले होते. त्यांनी शेवटी विषयांतराची पुडी सोडली, “काय जोशी, या महिन्यातला वाढदिवस कुणाचा आहे जरा लिस्टमध्ये पाहिलंत का?” कर्व्यांनी त्या सर्वांच्या नावांची पत्ता, फोन नंबर आणि जन्मतारीख यांसकट लिस्ट बनवली होती व ती प्रत्येकापाशी दिली होती. प्रत्येकापाशी जरी ती लिस्ट असली तरी,वाढदिवसाच्या पार्टीचा विषय निघाला की जोश्यांच्या पिशवीतून ती लिस्ट पटकन बाहेर यायची. जोश्यांनी डोळे बारीक करून लिस्ट पाहिली.'“देवधर, या महिन्यात तुमचा वाढदिवस आहे. ५ फेब्रुवारी म्हणजे आलाच की हो.म्हणजे,बघा, आज तारीख आहे १, वार आहे बुधवार. म्हणजे येत्या रविवारी देवधरांचा वाढदिवस. मग काय देवधर, ठरवताय ना पार्टी?" देवधरांनी नकळत मान डोलावली. त्यांच्या मान डोलावण्याने समाधान न झालेले जोशी म्हणाले, “चला, मग नक्की काय ते सांगा. वेळ सांगा.'' देवधर भांबावले होते. त्यांना पटकन काय बोलावं ते सुचेना. शेवटी सर्वांचं लक्ष  आपल्याकडेच आहे हे जाणवल्यावर त्यांनी सांगितलं, “रविवार तर नक्कीच. वेळ मात्र कितीची ते जरा घरातल्यांना विचारावं लागेल.” खवैया म्हणून प्रसिद्ध असलेले जोशीबुवा बरेच दिवसांत कुठला मेन्यू झाला नाही यावर दिलखुलास चर्चा करू लागले. खायची विशेष आवड असलेले त्यांच्यासारखेच आणखी एक-दोघंजण होते. त्यांचीही जोशांसोबत बॅटिंग सुरू होती. कर्वे मात्र एकटक देवधरांकडे पाहत होते. देवधर मनापासून हो म्हणालेले नाहीत हे त्यांना मनोमन जाणवलं. शेवटी न राहवून ते जोशी आणि त्यांच्या साथीदारांना म्हणाले, “तुमचा छंद बाकी अजब आहे. ज्यांच्याकडे जायचंय त्याची सोय प्रथम पाहायची का आपलं स्वत:चंच चालू द्यायचं?' देवधर म्हणाले, “नाही हो कर्वे, बोलू द्या त्यांना. ठरवू द्या काय ठरवायचं ते.”कर्व्यांनी नकारार्थी मान हलवली. '“देवधर, आपण कांदेनवमीपासून ते कोजागिरीपर्यंत सगळं साजरं करतोच.शिवाय, त्या व्यतिरिक्त ही वाढदिवसाच्या दिवशीची पार्टी एकमेकांच्या घरी करायची ही पद्धत का ठेवली? त्या निमित्ताने घरच्यांशी ओळख व्हावी म्हणून, पण जर तुमची काही अडचण असेल, घरचा काही प्रॉब्लेम असेल तर पार्टी ठेवणं काही कंपलसरी नाही.”देवधरांच्या उतरलेल्या चेहऱ्यावरून काहीतरी प्रॉब्लेम असावा असं सगळ्यांच्याच लक्षात आलं. काहीतरी थातूरमातूर उत्तर देऊन देवधर आज लवकरच उठले घरी जाण्यासाठी. ते गेल्यावर मात्र जोशी आणि मंडळींना जाणवलं की त्यांचं काहीतरी बिनसलंय. जोशी कर्व्यांना म्हणाले, “तुम्ही देवधरांना आपल्या या देवळात घेऊन आलात या गोष्टीलाही सव्वा वर्षं होऊन गेलं नाही का? पण विशेष मोकळेपणाने बोलत नाहीत बुवा. आजही पाहा मध्येच उठून निघून गेले" कर्वे म्हणाले, ''घरी काहीतरी प्रॉब्लेम असावा. बघतो, जमलं तर त्यांच्या घरीच जातो आणि विचारतो. कारण इथं तुमच्यासमोर ते काही बोलणार नाहीत." सर्वांनीच त्यांच्या सुरात सुर मिसळला. देवधर मधनच उठून निघाले खरं, पणत्यांना घरी जावं वाटेना. कसेबसे फरफटत्या पावलांनी ते निघाले. कसला वाढदिवस करताय!!! इथे घरी कुणी धड दोन वाक्य बोलायची मारामार. प्रत्येकजण आपापल्या विश्वात. त्यांना सांगायचं की "मंडळी येत्या रविवारी या तुमच्या घरातल्या म्हाताऱ्याचा वाढदिवस आहे म्हणून? आणि त्याच्या म्हाताऱ्या मित्रांसाठी पार्टीचं ठरवा म्हणून ?" देवधरांनो दार उघडलं. हातपाय धुऊन ते ओट्यापाशो आले. सुरुवातीच्या सर्वच वर्षांमध्ये ऑफिस आणि रुटीन यात व्यस्त असलेले देवधर निवृत्तीनंतर मात्र सुधामय होऊन गेले होते. रोहितलाही चांगली नोकरी लागली होतीच. तो साडेसातलाच ऑफिसला निघे. त्याची गडबड आटपली की देवधर स्वयंपाकघराजवळच एक खुर्ची धेऊन बसायचे. एकीकडे पेपर वाचता वाचता सुधाशी गप्पा मारणं चालायचं. त्या गप्पांपेक्षा सुधाताईंचं स्वयंपाकघरातलं वावरणं, चटाचट कामं हातावेगळी करणं, नीटनेटकेपणा, स्वच्छता हे सर्व निरखण्यातलं सुख ते अनुभवायचे. एकत्र जेवण, त्यानंतर थोडीशी नावालाच वामकुक्षी. मग पुन्हा एकत्र चहा आणि संध्याकाळी एकत्र फिरायला जाणं. हे त्यांचं निवृत्तीनंतरचं रुटीन सात-आठ वर्ष नेमाने चाललं.रोहित-रेणूचं लग्न झालं आणि कसल्याशा निमित्ताने सुधाताई निवर्तल्या. नातवाचं तोंडही न पाहताच गेल्या. देवधर एकटे पडले होते. साफ एकटे पडले होते. मग त्या एकटेपणाच्या वैफल्यात ते सतत चिडचिड करायचे. बऱ्याचदा रेणूवरच. तिचा अव्यवस्थितपणा, स्वयंपाकातली तिची कमी पडणारी हातोटी याचा त्यांना जरा जास्तच राग येऊ लागला होता. रोहित तर काय पहिल्यापासूनच अबोल. आता लग्नानंतर तर जे काही थोडं बोलायचा ते बायकोपाशीच.मुख्य म्हणजे घरातच नसायचा. बारा बारा तास कंपनीत अडकलेला.अन्न गरम करायला ठेवून देवधर एखाद्या चौकस स्त्रीसारखं ओट्याचं निरीक्षण करायला लागले. ओट्यामागच्या पांढर्या टाईल्स आता पिवळ्या पडल्या होत्या. सुधाताईंनी हौसेने आणलेलं तांब्याचं पिंप कळाहीन पडलं होतं. जेवायला बसल्यावर पहिल्या दोन घासांतच देवधरांनी मान उडवली.बिनचिंचगुळाची आमटी, तुपाचं बोट जणुकाही लांबूनच दाखवलेल्या जराशा कोरड्या पोळ्या, खमंग काकडीऐवजी काकडीचे काढलेले काप नि कसलीशी भाजी.त्यांना अन्न संपेचना. कसंबसं थोडंसं चिवडून ते पानावरून उठले. थोडीशी आवराआवरी केली आणि पेपर वाचायला घेतला. तो वाचता वाचता सवयीने त्यांना झोप लागली. तासभर झोपून झाल्यावर तीनच्या सुमाराला ते चहा ठेवायला म्हणून उठले. स्वत:चा चहा स्वत: करायला त्यांना अजिबात आवडत नसे. चहाच काय पण स्वत:च स्वत:ला वाढून घेणं, ते पाठीमागचं आवरणं, हे सर्व करणं त्यांना कधीच आवडत नसे. म्हणूनच रोहितचं लग्न ठरल्यापासूनच ते रेणूच्या नोकरीच्या विरोधात होते. कशाला हवी हिची नोकरी? मग घराकडे दुर्लक्ष!!! घराची आणि घरातल्या माणसांचीची आबाळ. पण रोहित-रेणू तडजोडीला तयार नव्हते त्यामुळेच रेणूची नोकरी चालूच राहिली.बेलचा आवाज ऐकू आल्यावर देवधर जरा विचारात पडले. आत्ता, यावेळी कोण? दार उघडून पाहतात तो समोर कर्वे. देवधर मनापासून हसले. “या या या कर्वे. आज मला चहाला कंपनी मिळणार तुमची. या बसा.”कर्वे सोफ्यावर बसताबसता म्हणाले, “तुमची झोप झाली होती ना? मला दुपारची झोप येतच नाही त्यामुळे दोन काय नी तीन काय, कितीही वाजले तरी मला फरक पडत नाही. म्हणून म्हटलं तुमच्या झोपेत व्यत्यय नाही ना आणला?"'“छे हो, माझी झोप झालीच होती. हा काय चहाच ठेवायला घेतलाय. जरा दोन मिनिटं बसा हं. मी आपला चहा घेऊनच येतो.” देवधर म्हणाले. .कर्वे वर्तमानपत्र चाळत बसले. पाचच मिनिटांत वाफाळता चहा घेऊन देवधर आले. म्हणाले, “घ्या घ्या, कर्वे चहा घ्या."कुणीतरी आल्याचं त्यांना फार बरं वाटलं. मुख्य म्हणजे देवळातून घरी परतल्यापासून ते दुसऱ्या दिवशी परत देवळात जाईपर्यंत ठेवावं लागणारं मौनव्रत आज अनपेक्षितपणे सुटलं होतं. . ..'“चहा फर्स्टक्लास झालाय हं देवधर. मुख्य म्हणजे आयता!!! स्वत:च्या हातचा पिऊन पिऊन येतो कंटाळा.” देवधरांना विषयाला तोंड फोडायला एवढंही निमित्त पुरेसं होतं. ते म्हणाले, “हो ना, घरात कुणी नाही म्हणून चहा आपला आपण करा. स्वतःच जेवायला वाढून घ्या. उरलंसुरलं काढून ठेवा. मागची आवराआवरी करा. दुध तापवा. हे सर्व जाणार बाहेर. मग आपण आहोतच.'त्यांच्या सुरातली नाराजी कर्व्यांच्या लक्षात आली. ते हसून म्हणाले, “आपल्या बायकोने जे वर्षानुवर्ष बिनबोभाट केलं, त्याचं एक छोटंसं  प्रात्यक्षिक आपल्याला करावे लागतंय असं समजून हे सर्व करायचं.""अजिबात नाहि.कर्वे खूप फरक आहे बरं.बायकोला आपण संध्याकाळी येणार याची ओढ असायची आणि आपल्यालाही घरी यायची ओढ असायची. एकमेकांशी मनसोक्त संवाद व्हायचा. हे असलं एकटेपण नव्ह्तं बायकोच्या वाट्याला येत."देवधर तळतळून म्हणाले. “मी समजू शकतो देवधर,आपल्यासारख्या लोकांची हीच तर ट्रॅजिडी  आहे. बायको फोटोत जाऊन बसलेली मुलगे एकतर अमेरिकेत, नाहीतर भारतातली नोकरी टिकवायच्या कसरतीत. दिवसदिवस कंपनीला जणू वाहिलेलेच. नातवंडं टीव्हीसमोर नाहीतर अभ्यासात आणि सुना नोकरीत आणि स्वयंपाकघरात.आपलं एकटेपण कुणाच्या लक्षात येणार? हे माझ्या तेव्हा लक्षात आलं जेव्हा ही गेली. मग तेव्हा ओंकारेश्वराचा ग्रुप : मी सुरू केला. You know I am one of  the founder members of this group."‘कर्वे, तुम्ही हे एकटेपण खूप खिलाडू वृत्तीने घेताय. तसं मला नाही बुवा जमणार. मला तर फार चिडायला होतं. असं वाटतं आपला आणि घरातल्या इतरांचा संबंध तरी. आहे का?” कर्वे मोठ्याने हसून म्हणाले, “मी आता...आठ-नऊ वर्षांनी या रुटीनला रुळलोय. मला कसलंच काही वाटत नाही. तुमचं मात्र बरोबर आहे. तुमच्याकडे वहिनींना जाऊन जेमतेम सव्वा वर्ष झालं नाही का? आम्हाला वहिनींची आठवण बरेचवेळा येते हं. आपल्या सोसायटीच्या गेट टुगेदरच्या वेळी त्यानी करून आणलेल्या सुरळीच्यावड्यांची चव अजून तोंडात आहे."आता मात्र देवधरांच्या मनाचा बांध फुटला. ते गहिवरून म्हणाले, “ही म्हणायची, कुणाच्या मनात शिरायचं असेल तर ते पोटातूनच. फार फार चविष्ट स्वयंपाक करायची. नाहीतर आजकालच्या मुली. कसलं ते बेचव जेवण करतात. ते अन्न,खाणाऱ्याला खावंसं तर वाटलं पाहिजे. शिवाय त्यांची कसली कसली फॅडं. आत्ता जो चहा प्यायलात ना कर्वे, तो कुठल्या दुधाचा होता माहीत आहे???गाईच्या दुधाचा!!!!का? तर म्हणे म्हशीच्या दुधात जास्ती फॅट्स असतात. "आम्ही आमच्याआयुष्यात  कधी गाईचं दूध नव्हतो प्यायलो. कसलं ते पिचकवणी.'' देवधरांनी हात झटकला. कर्वे तोच धागा पकडून म्हणाले, “देवधर, प्रत्येकाचं काहीतरी कारण असतं प्रत्येक गोष्टींमागे. ते आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणूनच आपसात संवाद हवा. तुम्ही बोलायला पाहिजे. तुम्ही फार मनात ठेवता बुवा. खरं म्हणजे मी तेच विचाराला आलो होतो. सकाळी देवळात तुमच्या वाढदिवसाचा विषय निघाला होता तेव्हा तुम्ही स्पष्टपणेकाही सांगितलं नाहीत. जरासे गडबडून गेलात. तुमची काही अडचण आहे का?”देवधर संकोचत म्हणाले, “नाही हो, म्हटलं तर काहीच अडचण नाही पण...” ते थांबले.....बोलावं की नाही या विचारात. कर्वे म्हणाले, “तुम्हाला कदाचित देवळात सर्वांसमोर सांगायला संकोच वाटला असेल. म्हणून तर मी आत्ता तुमच्याकडे आलो. बोला देवधर,काही प्रॉब्लेम असेल आणि नाही दिलीत पार्टी तरी चालेल.”  देवधर उतरलेल्या स्वरात म्हणाले, “घरी माझ्याशी कुणी बोलत नाही. कुणाच्या लक्षात तरी आहे का माझा वाढदिवस काय माहीत? मग कशाला सांगा की साजरा करा या थेरड्याचा वाढदिवस. घाला त्याच्या मित्रांना जेवायला.”“हात्तीच्या एवढंच ना? ठीक आहे.मी सर्वांना कळवतो  रविवारचं कॅन्सल म्हणून. तुम्ही त्रास करून घेऊ नका आणि वाईट तर मुळीच वाटून घेऊ नका.” कर्वे म्हणाले.“मी सर्वांच्या पार्ट्या खाल्ल्या या दीड वर्षात आणि स्वत:वर वेळ आल्यावर मात्र येऊ नका, जमणार नाही, हे सांगायला बरं नाही वाटत कर्वे.”"तुम्ही पार्टीचा विषय डोक्यातून काढून टाका देवधरं. आपल्याकडे तुमच्यासारखेच प्रॉब्लेम असलेली मंडळीही आहेत. पण मला फक्त एक सांगा, वहिनी गेल्यापासून तुम्ही स्वतःहून चिरंजीवांशी, सूनबाईंशी बोलायचा प्रयत्न कधी केलात? त्यांना जमेल तशी मदत, निदान नातवाला खेळवायच्या निमित्ताने, त्यांच्याजवळ कधी आपणहून गेलात?" कर्व्यांनी स्पष्टपणे विचारलं.देवधर बाणेदारपणे म्हणाले, “अजिबात जाणार नाही मी आपणहून बोलायला!! का जाऊ? मी माझ्या खोलीत पडून राहतो. सकाळी ते सर्व बाहेर पडले की मी माझ्या खोलीतून बाहेर पडतो आणि संध्याकाळी ते घरात शिरले की मी माझ्या खोलीत शिरतो. फक्त चहा आणि जेवणापुरताच बाहेर येतो."देवधरांचं तुटस वागणं ऐकून  कर्वे मात्र थक्क झाले होते. “'देवधर, तुम्ही असं केलंत तर तुमच्यात कसं बोलणंचालणं होणार? तुम्ही थोडंसं आपणहून पुढे गेलं पाहिजे. वहिनींशी  नव्हतातं बोलत? त्यांना नव्हतात का मदत करत?” '“तेव्हाची गोष्ट वेगळी होती. आत्ताची वेगळी आहे."देवधर म्हणाले. जरावेळाने बोलणं आवरतं घेत कर्वे उठले. निघताना त्यांनी स्वत: सर्वांना पार्टी कॅन्सल झाल्याचा निरोप सांगायची जबाबदारी घेतली.पुढचे तीन दिवस देवधर देवळातही गेले नाहीत. थोड्याशा संकोचाने, थोड्याशा अपराधीपणाच्या भावनेने ते घरातच राहिले. कर्व्यांच्या रोजच्या बोलवण्याला काहीतरी निमित्त सांगून त्यांनी देवळात जाणं टाळलं.शनिवारी संध्याकाळी रेणू जराशी लवकरच घरी आली. हातात नील तर होताच पण सामानाच्या दोन पिशव्यांचं ओझंही होतं तिच्या हातात. देवधरांनी दार उघडल्याक्षणी तिच्या हातातून त्या जड पिशव्या घेतल्या. बहुतेक भाजी वगैरे असेल या अंदाजाने त्यांनी त्या पिशव्या स्वयंपाकघरात नेऊन ठेवल्या. ते त्यांच्या खोलीत जायला निघाले तेवढ्यात रेणू म्हणाली, “दादा, उद्या संध्याकाळी माझे मामा-मामी आणि त्यांच्या घरातली सहा-सात जणं जेवायला येणार आहेत. तुम्ही कुठे जाऊ नका. घरीच थांबा. म्हणजे मामाला बोलायला कंपनी होईल. त्याला एकटं वाटणार नाही.”'“का? रोहित नाही का घरी?” देवधरांनी विचारलं. नाही म्हणायला स्वरात थोडा तिरकसपणा होता. '“नाही हो, रोहितला उद्याही ऑफिसला जायचंय.” रेणूने उत्तर दिलं आणि पुढे म्हणाली, “त्याला यायलाही उशीर होणार आहे. म्हणून प्लीज, तुम्ही घरी थांबा हं. कुठे जाऊ नका.”देवधरांच्या डोक्यात तिडीक गेली. हिच्या मामाला कंपनी हवी हा विचार ही करते, मग रोज रात्री मी एकटा जेवतो हे ही विसरते? जेवायला ही थांबते पण ते रोहितसाठी आणि बारीक आवाजात काय कुजबुजत असतात कोण जाणे! आणि रोहित? अरे आत्ताआत्तापर्यंत  मला चिडवायचा. म्हणायचा, 'दादांच्या वाढदिवसाला आई न चुकता बटाटेवडे आणि गोडाचा शिरा करते.' हा सुद्धा विसरला. रेणू तर काय परक्या घरचीच. ती काय माझा वाढदिवस लक्षात ठेवणार? बरं झालं देवळातल्या ग्रुपला उद्या नाही बोलावलं ते. रविवारी सकाळी देवधरांना लवकरच जाग आली. मनातून त्यांना वाटत होतं को, देवळातल्या ग्रुपमधल्या कुणाचातरी फोन येईल, पण नाही. त्यांना कुणीच फोन केला नाही. निदान कर्वे तरी! पण नाही, तेही नाही. दिवस त्यांनी तसाच ढकलला. दुपारपासून स्वयंपाकघरातून खमंग वास येऊ लागले होते. रेणूची लगबग चालली होती. एकीकडे नीलला सांभाळत होती. संध्याकाळी बरोबर सहा वाजले. दारावरची बेल वाजली. रेणूची गडबड पाहता देवधरांनी दार उघडणं अपेक्षित होतं. त्यांनी नाइलाजानेच दार उघडलं. पाहतात तो दारात सुहास्य मुद्रेने कवें उभे!!! हातात निशिगंधाचा मोठा गुच्छ.'“वाढदिवसाच्या शुभेच्छा देवधर.”पाठोपाठ खादाड जोशी, संघवाले परांजपे.एकेक करत सगळा पंधरा जणांचा ग्रुप घरात शिरला. देवधरांना हा अनपेक्षित धक्काच होता. पार्टी कॅन्सल हे कळवायचं कर्वे विसरले की काय? इतक्यात त्यांचं कुतूहल फारसं न ताणता रेणू पुढे आली. ती म्हणाली, “दादा, Happy Birthday. तुमच्यासाठी सरप्राईज बरं का. माझा मामा वगैरे कुणी येणारच नाहीये. मी ते तुम्ही कुठे बाहेर जाऊ नये म्हणून सांगितलं होतं.”देवधर स्तंभित होऊन हसले. कुणी सोफ्यावर, कुणी खुर्च्यांवर स्थानापन्न झाले.रेणू सर्वांसाठी पाणी आणायला आत गेली. देवधरांना कर्व्यांची शंका आली होती. बहुतेक त्यांनी रेणूला विश्वासात घेऊन हा प्लॅन बनवला असावा. पण मग त्याला काय अर्थ  होता???? रेणूने स्वतःहून.......इतक्यात कर्वे काही निमित्त काढून टेरेसवर गेले. त्यांनी देवधरांना खुणेने बोलावलं. देवधर गेल्यावर कर्वे म्हणाले, "देवधर हा माझा प्लॅन नाही बरं का. मुद्दाम सांगतो. कारण तुम्हाला शंका येईल की हे सगळं मीच घडवून आणलं की काय म्हणून सांगतो. काल रात्री तुमच्या चिरंजीवांचा फोन आला होता तेव्हा मला आजच्या पार्टीबद्दल कळलं.''देवधरांना मनापासून बरं वाटलं, पण रेणू-रोहितने आपल्याला काहीच पत्ता नाही लागू दिला?? ते कर्व्यांना घेऊन आत गेले. ''तुमचा ब्लॉक फारच छान आहे बरं का.” कुणीतरी म्हणालं. “सूनबाई, वास बाकी फर्मास सुटलाय हं.'' अर्थातच जोशीबुवा उद्गारले. रेणू हसली आणि म्हणाली, “लगेचच वाढते हं तुम्हाला सर्वांना. फक्त वडे गरमगरम तळायला घेते आणि आणते.”शेवटी सर्व सरंजाम ट्रेमध्ये मांडून रेणू आली. नीलचं मध्येमध्ये लुडबुडणं चालूच होतं. त्याला देवधर एकीकडे सांभाळत होते. त्यांना विचार करायला, प्रतिक्रिया व्यक्त करायला उसंतच मिळाली नव्हती इतक्या भराभर हे सर्व घडत होतं. गरमागरम बटाटेवडे, चटणी, साजूक तुपातला गोडाचा शिरा, बाजूला लोणच्याची फोड, शिवाय मसालेभात, टोमॅटोचं सार ह्या सर्व पदार्थांनी डिश गच्च भरली होती. *वडे आणि शिरा* हे प्लेटमध्ये दिसल्यावर देवधरांचे डोळे चमकले. त्यांनी हळूच सुधाताईंच्या फोटोकडे पाहिलं. रेणू आग्रह करकरून वाढत होती .वडे अतिशय चविष्ट झाले होते. वडेच कशाला, सर्वच मेन्यू चवदार झाला होता. *कुणाच्या मनात शिरायचं असेल तर ते पोटातून' हे वाक्य सिद्ध करण्याइतका!!!!*सर्वांचं खाणं झालं आणि जोशींनी कार्यक्रमाची सूत्रं हातात घेतली."सूनबाई, सर्व पदार्थ उत्तम झाले होते."रेणू प्लेट उचलता उचलता हसली. “तू काय सर्व्हिस करतेस का?”“हो, सिटी हॉस्पिटलमध्ये डाएटीशिअन आहे.” रेणू उत्तरली. ती रिकाम्या प्लेटस् घेऊन आत गेली. तेव्हा कर्वे हसत म्हणाले, 'जोशीबुवाना, आता सूनबाईंचा इंटरव्ह्यू घ्यायचा चान्स मिळाला!!!!"जोशींची ती खास स्टाईलच होती. जातील तिशे कुणालातरी धरायचे आणि मग प्रश्नांची सरबत्ती!!!!!रेणू हात कोरडे करत बाहेर आली."सूनबाई, बसा आता. मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत. तुला राग नाही ना येणार? हे सर्वजण मला चिडवतायत, म्हणतायत इंटरव्ह्यू घेणार का?'' जोशी म्हणाले.रेणू आत्मविश्वासाने म्हणाली, “मला हॉस्पिटलमध्ये सवय आहे पेशंट्सच्या शंकांना उत्तरं द्यायची. काही काही आजोबा तर फार चिकित्सक असतात, पण मी शांतपणे देते उत्तरं. तुम्ही विचारा.”“हा जोशा पण तितकाच चिकित्सक आहे बरं का.” परांजपे खोचकपणे म्हणाले.“सूनबाई, या वयात आम्ही काय डाएट घ्यावं यावर मला जरा सांगशील???”'' जोशींनी पहिला प्रश्न टाकला.“न्यूट्रीशनचा विचार केला तर रोजच्या जेवणात पालेभाजी, सॅलड, मोड आलेली कडधान्ये हे सर्व हवं, पण विशेषकरून तुमच्या वयाच्या सर्वांनीच लोकॅलरी, फॅट फ्री, कमी तेलकट, कमी तुपकट असं अन्न खाल्लं पाहिजे.” रेणू म्हणाली.'“म्हणजे कसं? किंवा तू मला सांग तू रोज स्वयंपाक करतेस त्यात तू हे सर्व कसं जमवतेस?”'“माझ्या भाज्या कमीत कमी तेलावर केलेल्या असतात. शक्यतो कोशिंबीर वगेरे प्रकार न करता मी कच्चं सॅलडच जेवणात ठेवते. कारण साध्या कोशींबिरीतही दाण्याचं कूट, फोडणीचं तेल, नारळ हे सर्व हाय कॅलरी पदार्थ आपण घालतो, नाही का? आमटी मी बिनचिंचगुळाची करते. दूध तर प्यायलाच हवं नाही का? मग मी म्हशीच्या दुधाऐवजी गाईचं दूध वापरते."शेवटच्या वाक्याला कर्वे व देवधरांची नजरानजर झाली. जोशींनी विचारलं, “मग आज हे सर्व नियम मोडून आजचे सर्व पदार्थ तू का केलेस?'' जोश्यांच्या चेहऱ्यावर मिस्कील भाव होते. रेणू म्हणाली, "आजची गोष्टच वेगळी. आज दादांचा वाढदिवस. शिवाय तुम्ही सर्वजण आज प्रथमच घरी आलात त्यामुळ. असा एखादा अपवाद चालतो.'' ''आता शेवटचा प्रश्न!!!!” असं जोशी म्हणाले आणि परांजपे वैतागले, “जोशी, बास आता तू म्हणजे काँग्रेसवाले विरोधीपक्ष नेत्यांत बसून विचारतात तशा प्रश्नांच्या फैरीवर फैरीच झाडतो आहेस.” जोशी त्याकडे दुर्लक्ष करत नेटाने म्हणाले, “तू हाच व्यवसाय का निवडलास?"रेणू जराशी गंभीर झाली. “सांगते, तुम्ही सर्वचजण मला वडिलांसारखे आहात. त्यामुळे सांगायला हरकत नाही. माझे वडील माझ्या वयाच्या सोळाव्या वर्षी गेले. डायबेटीस, बीपी आणि हार्ट ट्रबल हे तिन्ही प्रॉब्लेम त्यांना होते, पण अज्ञान आणि फाजील आत्मविश्वास या पोटी तिकडे दुर्लक्ष करत फक्त कुपथ्य करत राहिले. तेलकट  काय, तुपकट काय, गोड काय. शेवटी गँगरीन झालं. पाय कापून काढावा लागला. त्या धक्क्यातच ते शेवटी गेले. तेव्हाच हा व्यवसाय निवडायचं  मी ठरवलं आणि त्याच्याशी मी  प्रामाणिक आहे.हॉस्पिलटमध्येही आणि घरातही !  देवधर भारावल्यासारखे तिच्याकडे पाहत होते.जोशींबुवांना जे एका भेटीत साधलं ते आपल्याला चार वर्षांत साधू नये याची त्यांना कमाल वाटत होती. वातावरणही जरा गंभीरच झालं होतं. इतक्यात नीलच्या हातून पाणी सांडलं ते पुसायला म्हणून रेणू उठली. बाकीच्यांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या आणि तेवढ्यात कवें देवधरांना खूण करून टेरेसमध्ये घेऊन गेले. “देवधर, हा पाहिलात त्यांच्या दोघांकडून आलेला संवादाचा दुवा???? हा घट्ट पकडून ठेवा ! आणि सोडू नका त्या दुव्याला आयुष्यात कधीही.” .देवधर फक्त हसले. निघताना कुणीतरी जोशांची मस्करी केली, “जोशीबुवा,  सूनबाईंनी सांगितलेलं पथ्य तेवढं रोज पाळा म्हणजे झालं.” जोशी खिलाडूवृत्तीने हसले. सर्वचजण हसत हसत निघाले. निशिगंधाच्या गुच्छाचा दरवळ घरभर उरला होता. देवधर रेणूला  म्हणाले, “आज रोहितला घरी थांबता आलं  असतं तर बरं झालं असतं. त्याची या सर्वाशी ओळख झाली असती."रेणू जरा विचारात पडली होती. बोलावं की न बोलावं अशा विचारात तिने सांगून टाकलं, “दादा, आता तुम्हाला सांगायला हरकत नाही. रोहितच्या कंपनीत गेली एक वर्ष प्रॉब्लेम चालू होता. प्रचंड टेन्शन होतं आम्हा दोघांना. अगदी खरं सांगायचं तर , रोहितची नोकरी धोक्यात होती.कामाचा प्रचंड ताण असायचा त्यामुळे त्याला यायला सारखा उशीर व्हायचा. मग मीसुद्धा मुद्दाम थांबायची त्याच्यासाठी. एकत्र जेवायला बसलं की तो विषय सारखा निघायचा.देवधर हादरलेच होते!!!! ते म्हणाले, “अग, मला तुम्ही दोघांनी सांगायचं नाही का?''रेणू हसून म्हणाली, “रोहितची सक्त ताकीद होती तुम्हाला सांगायचं नाही म्हणून. म्हणून तर जेवायला बसताना विषय निघाला तरी आम्ही अक्षरशः कुजबुजत बोलायचो. तुमच्या कानावर काही पडू नये म्हणून. आता प्रश्न सुटला आहे फक्त काम मात्र खूप जास्त आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही जायला लागतं. पण मी म्हणते, जायला लागलं तर लागलं पण नोकरी तरी वाचली हे ही काही कमी नाही."''खरंय तू म्हणतेस ते, पण तरी एवढ्या कामाच्या व्यापात त्याने या सर्वांना फोन केला तरी कसा? कर्वे सांगत होते, काल रात्री त्याने सर्वाना फोन केला होता म्हणून.”''कवें आजोबांची सून माझ्याच बसला असते. तिच्याकडून मी तुमच्या सर्व नावांची आणि फोन नंबरची लिस्ट घेतली. तिच्याकडूनच तर मला कळलं तुम्ही त्या देवळात रोज जाता वगेरे. अर्थात वडे आणि शिर्याबद्दल मात्र रोहितने आवर्जून सांगितलं. तो म्हणाला बाकी काही केलं नाहीस तरी चालेल पण शिरा आणि वडे हवेतच. मागल्या वर्षी आईंना जाऊन तीन-चार महिनेच झाले होते त्यामुळे काहीच केलं नव्हतं."संवादाचा दुवा असा अलगद हातात येत होता. देवधर विचारात होते. मुळापासून हललेच होते. तरी वेळ हा लागलाच त्यांना, तीन दिवस ते बेडरूममध्ये नेहमीसारखेच बसून राहिले. चवथ्या दिवशी मात्र ते बाहेर आले.वेळ सकाळचीच!!!!!रेणूची धांदल, मधेमधे नीलची चालणारी लुडबूड. देवधरांना तयार झालेलं पाहताच रेणू म्हणाली, “दादा, बाहेर निघालात का?”ते उत्तरले, “नाही ग.आता आजपासून तू ऑफिसला निघालीस की तुझ्याबरोबरच मी निघत जाईन. नीलला पाळणाघरात मी पोचवत जाईन. तुझी फारच धावपळ होते ना?? नीलला पोचवलं की संध्याकाळसाठी, दुसऱ्या दिवसासाठी भाजी वगैरे मीच आणत जाईन."घरी आल्यावर नीलने केलेला पसारा आवरता आवरता देवधरांचं लक्ष सवयीप्रमाणे सुधाताईंच्या फोटेकडे गेलं. आज तो फोटो त्यांना जरा जास्तीच हसरा वाटला. @योगिनी श्रीनिवास पाळंदे,पुणे स्वत:ची पर्स अशी कसरत करत निघाली. देवधरांनी नातवाला कौतुकाने अच्छा केला खरा पण दुसऱ्याच क्षणी ते त्यांच्या विचारांच्या कोशात गुरफटले. सकाळपासून रेणूने बोललेलं हे तिसरं वाक्य होतं. पहिलं वाक्य “चहा घेताय ना” दुसरं वाक्य तिच्या चहाबरोबर पुन्हा “चहा घेता का थोडासा?”ही केलेली विचारणा. आणि तिसरं हे ऑफिसला निघाल्यावरचं वाक्य. ती जायची आणि मग तो सहा खोल्यांचा मोठा ब्लॉक, रेणूने ओट्यावर आणि नीलने घरभर केलेला पसारा. रेणूने करून ठेवलेला मिळमिळीत स्वयंपाक आणि भिंतीवरचा सुधाताईंचा हसरा फोटो हे उरायचं देवधरांसाठी आणि दिवसभर ते त्यातच गुरफटायचे. स्वत:च्याएकटेपणाचा आलेला राग कधी स्वयंपाकघरातल्या अन्नावर, तर कधी घरातल्या पसाऱ्यावर काढत ते कुढत बसायचे."देवधर, येताय ना?” अशी कर्व्यांची खणखणीत हाक ऐकू आल्यावर देवधर दचकले. त्यांनी टेरेसमधून समोरच्या इमारतीतल्या बाल्कनीत उभे राहून हाक मारणाऱ्या कर्व्यांना निघायची खूण केली आणि ते घर बंद करून निघाले. औंकारेश्वराच्या त्या देवळात कर्वे गेली आठ ते दहा वर्ष नेमाने जात होते. बरोबर अकरा ते एक या वेळात त्यांच्यासारख्याच साठी उलटून गेलेल्या सिनियर सिटिझन्सचा ग्रुप तिथे जमायचा. प्रत्येकाच्या प्रकृतीच्या तक्रारी सारख्याच असायच्या. घरातला एकटेपणा, जनरेशन गॅप, इतकंच काय पण सरकारची बदललेली टॅक्स पॉलिसी हा सुद्धा सर्वांचा  जिव्हाळ्याचा विषय असायचा. प्रत्येकाचंच आपापल्या दु:खातून बाहेर यायचं हे एकमेव ठिकाण होतं, हक्काचं !!!!. सुधाताईंच्या निधनानंतर कोसळून गेलेल्या देवधरांनाही कर्व्यांनी इथे आणलं होतं. आज सर्वांच्याच गप्पा रंगल्या होत्या राजकारणावर. अडवानी आणि त्यांचे हिंदू राष्ट्राविषयीचे कथित वक्तव्य यावरून संघवाल्या परांजप्यांची सर्वजण फिरकी घेत होते. देवधर आणि कर्वेही त्यात सामील झाले. परांजपे सर्वांना गप्प करून बेजार झाले होते. त्यांनी शेवटी विषयांतराची पुडी सोडली, “काय जोशी, या महिन्यातला वाढदिवस कुणाचा आहे जरा लिस्टमध्ये पाहिलंत का?” कर्व्यांनी त्या सर्वांच्या नावांची पत्ता, फोन नंबर आणि जन्मतारीख यांसकट लिस्ट बनवली होती व ती प्रत्येकापाशी दिली होती. प्रत्येकापाशी जरी ती लिस्ट असली तरी,वाढदिवसाच्या पार्टीचा विषय निघाला की जोश्यांच्या पिशवीतून ती लिस्ट पटकन बाहेर यायची. जोश्यांनी डोळे बारीक करून लिस्ट पाहिली.'“देवधर, या महिन्यात तुमचा वाढदिवस आहे. ५ फेब्रुवारी म्हणजे आलाच की हो.म्हणजे,बघा, आज तारीख आहे १, वार आहे बुधवार. म्हणजे येत्या रविवारी देवधरांचा वाढदिवस. मग काय देवधर, ठरवताय ना पार्टी?" देवधरांनी नकळत मान डोलावली. त्यांच्या मान डोलावण्याने समाधान न झालेले जोशी म्हणाले, “चला, मग नक्की काय ते सांगा. वेळ सांगा.'' देवधर भांबावले होते. त्यांना पटकन काय बोलावं ते सुचेना. शेवटी सर्वांचं लक्ष  आपल्याकडेच आहे हे जाणवल्यावर त्यांनी सांगितलं, “रविवार तर नक्कीच. वेळ मात्र कितीची ते जरा घरातल्यांना विचारावं लागेल.” खवैया म्हणून प्रसिद्ध असलेले जोशीबुवा बरेच दिवसांत कुठला मेन्यू झाला नाही यावर दिलखुलास चर्चा करू लागले. खायची विशेष आवड असलेले त्यांच्यासारखेच आणखी एक-दोघंजण होते. त्यांचीही जोशांसोबत बॅटिंग सुरू होती. कर्वे मात्र एकटक देवधरांकडे पाहत होते. देवधर मनापासून हो म्हणालेले नाहीत हे त्यांना मनोमन जाणवलं. शेवटी न राहवून ते जोशी आणि त्यांच्या साथीदारांना म्हणाले, “तुमचा छंद बाकी अजब आहे. ज्यांच्याकडे जायचंय त्याची सोय प्रथम पाहायची का आपलं स्वत:चंच चालू द्यायचं?' देवधर म्हणाले, “नाही हो कर्वे, बोलू द्या त्यांना. ठरवू द्या काय ठरवायचं ते.”कर्व्यांनी नकारार्थी मान हलवली. '“देवधर, आपण कांदेनवमीपासून ते कोजागिरीपर्यंत सगळं साजरं करतोच.शिवाय, त्या व्यतिरिक्त ही वाढदिवसाच्या दिवशीची पार्टी एकमेकांच्या घरी करायची ही पद्धत का ठेवली? त्या निमित्ताने घरच्यांशी ओळख व्हावी म्हणून, पण जर तुमची काही अडचण असेल, घरचा काही प्रॉब्लेम असेल तर पार्टी ठेवणं काही कंपलसरी नाही.”देवधरांच्या उतरलेल्या चेहऱ्यावरून काहीतरी प्रॉब्लेम असावा असं सगळ्यांच्याच लक्षात आलं. काहीतरी थातूरमातूर उत्तर देऊन देवधर आज लवकरच उठले घरी जाण्यासाठी. ते गेल्यावर मात्र जोशी आणि मंडळींना जाणवलं की त्यांचं काहीतरी बिनसलंय. जोशी कर्व्यांना म्हणाले, “तुम्ही टेवधरांना आपल्या या देवळात घेऊन आलात या गोष्टीलाही सव्वा वर्षं होऊन गेलं नाही का? पण विशेष मोकळेपणाने बोलत नाहीत बुवा. आजही पाहा मध्येच उठून निघून गेले" कर्वे म्हणाले, ''घरी काहीतरी प्रॉब्लेम असावा. बघतो, जमलं तर त्यांच्या घरीच जातो आणि विचारतो. कारण इथं तुमच्यासमोर ते काही बोलणार नाहीत." सर्वांनीच त्यांच्या सुरात सुर मिसळला. देवधर मधनच उठून निघाले खरं, पणत्यांना घरी जावं वाटेना. कसेबसे फरफटत्या पावलांनी ते निघाले. कसला वाढदिवस करताय!!! इथे घरी कुणी धड दोन वाक्य बोलायची मारामार. प्रत्येकजण आपापल्या विश्वात. त्यांना सांगायचं की "मंडळी येत्या रविवारी या तुमच्या घरातल्या म्हाताऱ्याचा वाढदिवस आहे म्हणून? आणि त्याच्या म्हाताऱ्या मित्रांसाठी पार्टीचं ठरवा म्हणून ?" देवधरांनो दार उघडलं. हातपाय धुऊन ते ओट्यापाशो आले. सुरुवातीच्या सर्वच वर्षांमध्ये ऑफिस आणि रुटीन यात व्यस्त असलेले देवधर निवृत्तीनंतर मात्र सुधामय होऊन गेले होते. रोहितलाही चांगली नोकरी लागली होतीच. तो साडेसातलाच ऑफिसला निघे. त्याची गडबड आटपली की देवधर स्वयंपाकघराजवळच एक खुर्ची धेऊन बसायचे. एकीकडे पेपर वाचता वाचता सुधाशी गप्पा मारणं चालायचं. त्या गप्पांपेक्षा सुधाताईंचं स्वयंपाकघरातलं वावरणं, चटाचट कामं हातावेगळी करणं, नीटनेटकेपणा, स्वच्छता हे सर्व निरखण्यातलं सुख ते अनुभवायचे. एकत्र जेवण, त्यानंतर थोडीशी नावालाच वामकुक्षी. मग पुन्हा एकत्र चहा आणि संध्याकाळी एकत्र फिरायला जाणं. हे त्यांचं निवृत्तीनंतरचं रुटीन सात-आठ वर्ष नेमाने चाललं.रोहित-रेणूचं लग्न झालं आणि कसल्याशा निमित्ताने सुधाताई निवर्तल्या. नातवाचं तोंडही न पाहताच गेल्या. देवधर एकटे पडले होते. साफ एकटे पडले होते. मग त्या एकटेपणाच्या वैफल्यात ते सतत चिडचिड करायचे. बऱ्याचदा रेणूवरच. तिचा अव्यवस्थितपणा, स्वयंपाकातली तिची कमी पडणारी हातोटी याचा त्यांना जरा जास्तच राग येऊ लागला होता. रोहित तर काय पहिल्यापासूनच अबोल. आता लग्नानंतर तर जे काही थोडं बोलायचा ते बायकोपाशीच.मुख्य म्हणजे घरातच नसायचा. बारा बारा तास कंपनीत अडकलेला.अन्न गरम करायला ठेवून देवधर एखाद्या चौकस स्त्रीसारखं ओट्याचं निरीक्षण करायला लागले. ओट्यामागच्या पांढर्या टाईल्स आता पिवळ्या पडल्या होत्या. सुधाताईंनी हौसेने आणलेलं तांब्याचं पिंप कळाहीन पडलं होतं. जेवायला बसल्यावर पहिल्या दोन घासांतच देवधरांनी मान उडवली.बिनचिंचगुळाची आमटी, तुपाचं बोट जणुकाही लांबूनच दाखवलेल्या जराशा कोरड्या पोळ्या, खमंग काकडीऐवजीकाकडीचे काढलेले काप नि कसलीशी भाजी.त्यांना अन्न संपेचना. कसंबसं थोडंसं चिवडून ते पानावरून उठले. थोडीशी आवराआवरी केली आणि पेपर वाचायला घेतला. तो वाचता वाचता सवयीने त्यांना झोप लागली. तासभर झोपून झाल्यावर तीनच्या सुमाराला ते चहा ठेवायला म्हणून उठले. स्वत:चा चहा स्वत: करायला त्यांना अजिबात आवडत नसे. चहाच काय पण स्वत:च स्वत:ला वाढून घेणं, ते पाठीमागचं आवरणं, हे सर्व करणं त्यांना कधीच आवडत नसे. म्हणूनच रोहितचं लग्न ठरल्यापासूनच ते रेणूच्या नोकरीच्या विरोधात होते. कशाला हवी हिची नोकरी? मग घराकडे दुर्लक्ष!!! घराची आणि घरातल्या माणसांचीची आबाळ. पण रोहित-रेणू तडजोडीला तयार नव्हते त्यामुळेच रेणूची नोकरी चालूच राहिली.बेलचा आवाज ऐकू आल्यावर देवधर जरा विचारात पडले. आत्ता, यावेळी कोण? दार उघडून पाहतात तो समोर कर्वे. देवधर मनापासून हसले. “या या या कर्वे. आज मला चहाला कंपनी मिळणार तुमची. या बसा.”कर्वे सोफ्यावर बसताबसता म्हणाले, “तुमची झोप झाली होती ना? मला दुपारची झोप येतच नाही त्यामुळे दोन काय नी तीन काय, कितीही वाजले तरी मला फरक पडत नाही. म्हणून म्हटलं तुमच्या झोपेत व्यत्यय नाही ना आणला?"'“छे  जेमतेम सव्वा वर्ष झालं नाही का? आम्हाला वहिनींची आठवण बरेचवेळा येते हं. आपल्या सोसायटीच्या गेट टुगेदरच्या वेळी त्यानी करून आणलेल्या सुरळीच्यावड्यांची चव अजून तोंडात आहे."आता मात्र देवधरांच्या मनाचा बांध फुटला. ते गहिवरून म्हणाले, “ही म्हणायची, कुणाच्या मनात शिरायचं असेल तर ते पोटातूनच. फार फार चविष्ट स्वयंपाक करायची. नाहीतर आजकालच्या मुली. कसलं ते बेचव जेवण करतात. ते अन्न,खाणाऱ्याला खावंसं तर वाटलं पाहिजे. शिवाय त्यांची कसली कसली फॅडं. आत्ता जो चहा प्यायलात ना कर्वे, तो कुठल्या दुधाचा होता माहीत आहे???गाईच्या दुधाचा!!!!का? तर म्हणे म्हशीच्या दुधात जास्ती फॅट्स असतात. "आम्ही आमच्याआयुष्यात  कधी गाईचं दूध नव्हतो प्यायलो. कसलं ते पिचकवणी.'' देवधरांनी हात झटकला. कर्वे तोच धागा पकडून म्हणाले, “देवधर, प्रत्येकाचं काहीतरी कारण असतं प्रत्येक गोष्टींमागे. ते आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणूनच आपसात संवाद हवा. तुम्ही बोलायला पाहिजे. तुम्ही फार मनात ठेवता बुवा. खरं म्हणजे मी तेच विचाराला आलो होतो. सकाळी देवळात तुमच्या वाढदिवसाचा विषय निघाला होता तेव्हा तुम्ही स्पष्टपणेकाही सांगितलं नाहीत. जरासे गडबडून गेलात. तुमची काही अडचण आहे का?”देवधर संकोचत म्हणाले, “नाही हो, म्हटलं तर काहीच अडचण नाही पण...” ते थांबले.....बोलावं की नाही या विचारात. कर्वे म्हणाले, “तुम्हाला कदाचित देवळात सर्वांसमोर सांगायला संकोच वाटला असेल. म्हणून तर मी आत्ता तुमच्याकडे आलो. बोला देवधर,काही प्रॉब्लेम असेल आणि नाही दिलीत पार्टी तरी चालेल.”  देवधर उतरलेल्या स्वरात म्हणाले, “घरी माझ्याशी कुणी बोलत नाही. कुणाच्या लक्षात तरी आहे का माझा वाढदिवस काय माहीत? मग कशाला सांगा की साजरा करा या थेरड्याचा वाढदिवस. घाला त्याच्या मित्रांना जेवायला.”“हात्तीच्या एवढंच ना? ठीक आहे.मी सर्वांना कळवतो  रविवारचं कॅन्सल म्हणून. तुम्ही त्रास करून घेऊ नका आणि वाईट तर मुळीच वाटून घेऊ नका.” कर्वे म्हणाले.“मी सर्वांच्या पार्ट्या खाल्ल्या या दीड वर्षात आणि स्वत:वर वेळ आल्यावर मात्र येऊ नका, जमणार नाही, हे सांगायला बरं नाही वाटत कर्वे.”"तुम्ही पार्टीचा विषय डोक्यातून काढून टाका देवधरं. आपल्याकडे तुमच्यासारखेच प्रॉब्लेम असलेली मंडळीही आहेत. पण मला फक्त एक सांगा, वहिनी गेल्यापासून तुम्ही स्वतःहून चिरंजीवांशी, सूनबाईंशी बोलायचा प्रयत्न कधी केलात? त्यांना जमेल तशी मदत, निदान नातवाला खेळवायच्या निमित्ताने, त्यांच्याजवळ कधी आपणहून गेलात?" कर्व्यांनी स्पष्टपणे विचारलं.देवधर बाणेदारपणे म्हणाले, “अजिबात जाणार नाही मी आपणहून बोलायला!! का जाऊ? मी माझ्या खोलीत पडून राहतो. सकाळी ते सर्व बाहेर पडले की मी माझ्या खोलीतून बाहेर पडतो आणि संध्याकाळी ते घरात शिरले की मी माझ्या खोलीत शिरतो. फक्त चहा आणि जेवणापुरताच बाहेर येतो."हे ऐकून मात्र कर्वे थक्क झाले होते. “'देवधर, तुम्ही असं केलंत तर तुमच्यात कसं बोलणंचालणं होणार? तुम्ही थोडंसं आपणहून पुढे गेलं पाहिजे. वहिनींशी  नव्हतातं बोलत? त्यांना नव्हतात का मदत करत?” '“तेव्हाची गोष्ट वेगळी होती. आत्ताची वेगळी आहे."देवधर म्हणाले. जरावेळाने बोलणं आवरतं घेत कर्वे उठले. निघताना त्यांनी स्वत: सर्वांना पार्टी कॅन्सल झाल्याचा निरोप सांगायची जबाबदारी घेतली.पुढचे तीन दिवस देवधर देवळातही गेले नाहीत. थोड्याशा संकोचाने, थोड्याशा अपराधीपणाच्या भावनेने ते घरातच राहिले. कर्व्यांच्या रोजच्या बोलवण्याला काहीतरी निमित्त सांगून त्यांनी देवळात जाणं टाळलं.शनिवारी संध्याकाळी रेणू जराशी लवकरच घरी आली. हातात नील तर होताच पण सामानाच्या दोन पिशव्यांचं ओझंही होतं तिच्या हातात. देवधरांनी दार उघडल्याक्षणी तिच्या हातातून त्या जड पिशव्या घेतल्या. बहुतेक भाजी वगैरे असेल या अंदाजाने त्यांनी त्या पिशव्या स्वयंपाकघरात नेऊन ठेवल्या. ते त्यांच्या खोलीत जायला निघाले तेवढ्यात रेणू म्हणाली, “दादा, उद्या संध्याकाळी माझे मामा-मामी आणि त्यांच्या घरातली सहा-सात जणं जेवायला येणार आहेत. तुम्ही कुठे जाऊ नका. घरीच थांबा. म्हणजे मामाला बोलायला कंपनी होईल. त्याला एकटं वाटणार नाही.”'“का? रोहित नाही का घरी?” देवधरांनी विचारलं. नाही म्हणायला स्वरात थोडा तिरकसपणा होता. '“नाही हो, रोहितला उद्याही ऑफिसला जायचंय.” रेणूने उत्तर दिलं आणि पुढे म्हणाली, “त्याला यायलाही उशीर होणार आहे. म्हणून प्लीज, तुम्ही घरी थांबा हं. कुठे जाऊ नका.”देवधरांच्या डोक्यात तिडीक गेली. हिच्या मामाला कंपनी हवी हा विचार ही करते, मग रोज रात्री मी एकटा जेवतो हे ही विसरते? जेवायला ही थांबते पण ते रोहितसाठी आणि बारीक आवाजात काय कुजबुजत असतात कोण जाणे! आणि रोहित? अरे आत्ताआत्तापर्यंत  मला चिडवायचा. म्हणायचा, 'दादांच्या वाढदिवसाला आई न चुकता बटाटेवडे आणि गोडाचा शिरा करते.' हा सुद्धा विसरला. रेणू तर काय परक्या घरचीच. ती काय माझा वाढदिवस लक्षात ठेवणार? बरं झालं देवळातल्या ग्रुपला उद्या नाही बोलावलं ते. रविवारी सकाळी देवधरांना लवकरच जाग आली. मनातून त्यांना वाटत होतं को, देवळातल्या ग्रुपमधल्या कुणाचातरी फोन येईल, पण नाही. त्यांना कुणीच फोन केला नाही. निदान कर्वे तरी! पण नाही, तेही नाही. दिवस त्यांनी तसाच ढकलला. दुपारपासून स्वयंपाकघरातून खमंग वास येऊ लागले होते. रेणूची लगबग चालली होती. एकीकडे नीलला सांभाळत होती. संध्याकाळी बरोबर सहा वाजले. दारावरची बेल वाजली. रेणूची गडबड पाहता देवधरांनी दार उघडणं अपेक्षित होतं. त्यांनी नाइलाजानेच दार उघडलं. पाहतात तो दारात सुहास्य मुद्रेने कवें उभे!!! हातात निशिगंधाचा मोठा गुच्छ.'“वाढदिवसाच्या शुभेच्छा देवधर.”पाठोपाठ खादाड जोशी, संघवाले परांजपे.एकेक करत सगळा पंधरा जणांचा ग्रुप घरात शिरला. देवधरांना हा अनपेक्षित धक्काच होता. पार्टी कॅन्सल हे कळवायचं कर्वे विसरले की काय? इतक्यात त्यांचं कुतूहल फारसं न ताणता रेणू पुढे आली. ती म्हणाली, “दादा, Happy Birthday. तुमच्यासाठी सरप्राईज बरं का. माझा मामा वगैरे कुणी येणारच नाहीये. मी ते तुम्ही कुठे बाहेर जाऊ नये म्हणून सांगितलं होतं.”देवधर स्तंभित होऊन हसले. कुणी सोफ्यावर, कुणी खुर्च्यांवर स्थानापन्न झाले.रेणू सर्वांसाठी पाणी आणायला आत गेली. देवधरांना कर्व्यांची शंका आली होती. बहुतेक त्यांनी रेणूला विश्वासात घेऊन हा प्लॅन बनवला असावा. पण मग त्याला काय अर्थ होता???? रेणूने स्वतःहून.......इतक्यात कर्वे काही निमित्त काढून टेरेसवर गेले. त्यांनी देवधरांना खुणेने बोलावलं. देवधर गेल्यावर कर्वे म्हणाले, "देवधर हा माझा प्लॅन नाही बरं का. मुद्दाम सांगतो. कारण तुम्हाला शंका येईल की हे सगळं मीच घडवून आणलं की काय म्हणून सांगतो. काल रात्री तुमच्या चिरंजीवांचा फोन आला होता तेव्हा मला आजच्या पार्टीबद्दल कळलं.''देवधरांना मनापासून बरं वाटलं, पण रेणू-रोहितने आपल्याला काहीच पत्ता नाही लागू दिला?? ते कर्व्यांना घेऊन आत गेले. ''तुमचा ब्लॉक फारच छान आहे बरं का.” कुणीतरी म्हणालं. “सूनबाई, वास बाकी फर्मास सुटलाय हं.'' अर्थातच जोशीबुवा उद्गारले. रेणू हसली आणि म्हणाली, “लगेचच वाढते हं तुम्हाला सर्वांना. फक्त वडे गरमगरम तळायला घेते आणि आणते.”शेवटी सर्व सरंजाम ट्रेमध्ये मांडून रेणू आली. नीलचं मध्येमध्ये लुडबुडणं चालूच होतं. त्याला देवधर एकीकडे सांभाळत होते. त्यांना विचार करायला, प्रतिक्रिया व्यक्त करायला उसंतच मिळाली नव्हती इतक्या भराभर हे सर्व घडत होतं. गरमागरम बटाटेवडे, चटणी, साजूक तुपातला गोडाचा शिरा, बाजूला लोणच्याची फोड, शिवाय मसालेभात, टोमॅटोचं सार ह्या सर्व पदार्थांनी डिश गच्च भरली होती. वडे आणि शिरा हे प्लेटमध्ये दिसल्यावर देवधरांचे डोळे चमकले. त्यांनी हळूच सुधाताईंच्या फोटोकडे पाहिलं. रेणू आग्रह करकरून वाढत होती .वडे अतिशय चविष्ट झाले होते. वडेच कशाला, सर्वच मेन्यू चवदार झाला होता. कुणाच्या मनात शिरायचं असेल तर ते पोटातून' हे वाक्य सिद्ध करण्याइतका!!!!सर्वांचं खाणं झालं आणि जोशींनी कार्यक्रमाची सूत्रं हातात घेतली."सूनबाई, सर्व पदार्थ उत्तम झाले होते."रेणू प्लेट उचलता उचलता हसली. “तू काय सर्व्हिस करतेस का?”“हो, सिटी हॉस्पिटलमध्ये डाएटीशिअन आहे.” रेणू उत्तरली. ती रिकाम्या प्लेटस् घेऊन आत गेली. तेव्हा कर्वे हसत म्हणाले, 'जोशीबुवाना, आता सूनबाईंचा इंटरव्ह्यू घ्यायचा चान्स मिळाला!!!!!"जोशींची ती खास स्टाईलच होती. जातील तिशे कुणालातरी धरायचे आणि मग प्रश्नांची सरबत्ती!!!!!सर्वजण हसत होते. रेणू हात कोरडे करत बाहेर आली."सूनबाई, बसा आता. मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत. तुला राग नाही ना येणार? हे सर्वजण मला चिडवतायत, म्हणतायत इंटरव्ह्यू घेणार का?'' जोशी म्हणाले.रेणू आत्मविश्वासाने म्हणाली, “मला हॉस्पिटलमध्ये सवय आहे पेशंट्सच्या शंकांना उत्तरं द्यायची. काही काही आजोबातर फार चिकित्सक असतात, पण मी शांतपणे देते उत्तरं. तुम्ही विचारा.”“हा जोशा पण तितकाच चिकित्सक आहे बरं का.” परांजपे खोचकपणे म्हणाले.“सूनबाई, या वयात आम्ही काय डाएट घ्यावं यावर मला जरा सांगशील???”'' जोशींनी पहिला प्रश्न टाकला.“न्यूट्रीशनचा विचार केला तर रोजच्या जेवणात पालेभाजी, सॅलड, मोड आलेली कडधान्ये हे सर्व हवं, पण विशेषकरून तुमच्या वयाच्या सर्वांनीच लोकॅलरी, फॅट फ्री, कमी तेलकट, कमी तुपकट असं अन्न खाल्लं पाहिजे.” रेणू म्हणाली.'“म्हणजे कसं? किंवा तू मला सांग तू रोज स्वयंपाक करतेस त्यात तू हे सर्व कसं जमवतेस?”'“माझ्या भाज्या कमीत कमी तेलावर केलेल्या असतात. शक्यतो कोशिंबीर वगेरे प्रकार न करता मी कच्चं सॅलडच जेवणात ठेवते. कारण साध्या कोशींबिरीतही दाण्याचं कूट, फोडणीचं तेल, नारळ हे सर्व हाय कॅलरी पदार्थ आपण घालतो, नाही का? आमटी मी बिनचिंचगुळाची करते. दूध तर प्यायलाच हवं नाही का? मग मी म्हशीच्या दुधाऐवजी गाईचं दूध वापरते."शेवटच्या वाक्याला कर्वे व देवधरांची नजरानजर झाली. जोशींनी विचारलं, “मग आज हे सर्व नियम मोडून आजचे सर्व पदार्थ तू का केलेस?'' जोश्यांच्या चेहऱ्यावर मिस्कील भाव होते. रेणू म्हणाली, "आजची गोष्टच वेगळी. आज दादांचा वाढदिवस. शिवाय तुम्ही सर्वजण आज प्रथमच घरी आलात त्यामुळ. असा एखादा अपवाद चालतो.'' ''आता शेवटचा प्रश्न!!!!” असं जोशी म्हणाले आणि परांजपे वैतागले, “जोशी, बास आता तू म्हणजे काँग्रेसवाले विरोधीपक्ष नेत्यांत बसून विचारतात तशा प्रश्नांच्या फैरीवर फैरीच झाडतो आहेस.” जोशी त्याकडे दुर्लक्ष करत नेटाने म्हणाले, “तू हाच व्यवसाय का निवडलास?"रेणू जराशी गंभीर झाली. “सांगते, तुम्ही सर्वचजण मला वडिलांसारखे आहात. त्यामुळे सांगायला हरकत नाही. माझे वडील माझ्या वयाच्या सोळाव्या वर्षी गेले. डायबेटीस, बीपी आणि हार्ट ट्रबल हे तिन्ही प्रॉब्लेम त्यांना होते, पण अज्ञान आणि फाजील आत्मविश्वास या पोटी तिकडे दुर्लक्ष करत फक्त कुपथ्य करत राहिले. तेलकट  काय, तुपकट काय, गोड काय. शेवटी गँगरीन झालं. पाय कापून काढावा लागला. त्यातच ते शेवटी गेले. तेव्हाच हा व्यवसाय निवडायचं ठरवलं आणि त्याच्याशी मी  प्रामाणिक आहे. हॉस्पिलटमध्येही आणि घरातही !  देवधर भारावल्यासारखे तिच्याकडे पाहत होते. वातावरणही जरा गंभीरच झालं होतं. इतक्यात नीलच्या हातून पाणी सांडलं. आणि ते पुसायला म्हणून रेणू उठली. बाकीच्यांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या आणि तेवढ्यात कवें देवधरांना खूण करून टेरेसमध्ये घेऊन गेले. “देवधर, हा पाहिलात त्यांच्या दोघांकडून आलेला संवादाचा दुवा???? हा घट्ट पकडून ठेवा ! आणि सोडू नका त्या दुव्याला आयुष्यात कधीही.” .देवधर फक्त हसले. निघताना कुणीतरी जोशांची मस्करी केली, “जोशीबुवा,  सूनबाईंनी सांगितलेलं पथ्य तेवढं रोज पाळा म्हणजे झालं.” जोशी खिलाडूवृत्तीने हसले. सर्वचजण हसत हसत निघाले. निशिगंधाच्या गुच्छाचा दरवळ घरभर उरला होता. देवधर रेणूला  म्हणाले, “आज रोहितला घरी थांबता आलं  असतं तर बरं झालं असतं. त्याची या सर्वाशी ओळख झाली असती."रेणू जरा विचारात पडली होती. बोलावं की न बोलावं अशा विचारात तिने सांगून टाकलं, “दादा, आता तुम्हाला सांगायला हरकत नाही. रोहितच्या कंपनीत गेली एक वर्ष प्रॉब्लेम चालू होता. प्रचंड टेन्शन होतं आम्हा दोघांना. अगदी खरं सांगायचं तर , रोहितची नोकरी धोक्यात होती.कामाचा प्रचंड ताण असायचा त्यामुळे त्याला यायला सारखा उशीर व्हायचा. मग मीसुद्धा मुद्दाम थांबायची त्याच्यासाठी. एकत्र जेवायला बसलं की तो विषय सारखा निघायचा.देवधर हादरलेच होते!!!! ते म्हणाले, “अग, मला तुम्ही दोघांनी सांगायचं नाही का?''रेणू हसून म्हणाली, “रोहितची सक्त ताकीद होती तुम्हाला सांगायचं नाही म्हणून. म्हणून तर जेवायला बसताना विषय निघाला तरी आम्ही अक्षरशः कुजबुजत बोलायचो. तुमच्या कानावर काही पडू नये म्हणून. आता प्रश्न सुटला आहे फक्त काम मात्र खूप जास्त आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही जायला लागतं. पण मी म्हणते, जायला लागलं तर लागलं पण नोकरी तरी वाचली हे ही काही कमी नाही."''खरंय तू म्हणतेस ते, पण तरी एवढ्या कामाच्या व्यापात त्याने या सर्वांना फोन केला तरी कसा? कर्वे सांगत होते, काल रात्री त्याने सर्वाना फोन केला होता म्हणून.”''कवें आजोबांची सून माझ्याच बसला असते. तिच्याकडून मी तुमच्या सर्व नावांची आणि फोन नंबरची लिस्ट घेतली. तिच्याकडूनच तर मला कळलं तुम्ही त्या देवळात रोज जाता वगेरे. अर्थात वडे आणि शिर्याबद्दल मात्र रोहितने आवर्जून सांगितलं. तो म्हणाला बाकी काही केलं नाहीस तरी चालेल पण शिरा आणि वडे हवेतच. मागल्या वर्षी आईंना जाऊन तीन-चार महिनेच झाले होते त्यामुळे काहीच केलं नव्हतं."संवादाचा दुवा असा अलगद हातात येत होता. देवधर विचारात होते. मुळापासून हललेच होते. तरी वेळ हा लागलाच त्यांना, तीन दिवस ते बेडरूममध्ये नेहमीसारखेच बसून राहिले. चवथ्या दिवशी मात्र ते बाहेर आले. वेळ सकाळचीच. रेणूची धांदल, मधेमधे नीलची चालणारी लुडबूड. देवधरांना तयार झालेलं पाहताच रेणू म्हणाली, “दादा, बाहेर निघालात का?”ते उत्तरले, “नाही ग. आता आजपासून तू ऑफिसला निघालीस की तुझ्याबरोबरच मी निघत जाईन. नीलला पाळणाघरात मी पोचवत जाईन. तुझी फारच धावपळ होते ना?? नीलला पोचवलं की संध्याकाळसाठी, दुसऱ्यादिवसासाठी भाजी वगैरे मीच आणत जाईन."घरी आल्यावर नीलने केलेला पसारा आवरता आवरता देवधरांचं लक्ष सवयीप्रमाणे सुधाताईंच्या फोटेकडे गेलं. आज तो फोटो त्यांना जरा जास्तीच हसरा वाटला. @योगिनी श्रीनिवास पाळंदे,पुणे